आनंद कुरुडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
तिचं ऐकतो म्हणून मी असा आहे कापुस पिंजून ठेवलेला ससा आहे तेज तर्रार केवढा होतो मी आता राहिलो जरासा आहे..!
पैसा नव्हे चिचोका आहे खर्चिक मी उधळ्या आहे नेहमी वाटते भाबडीला तिच्यामुळे मी हिशोबात आहे..!
आकडेमोड ती करते हिशोब तिचा मी जुळवतो नेटते हिशोब संसाराचा तिच्या हिशोबावर माझा जीव जडला आहे..!
तिच्या हो ला हो म्हणत मी माझीच रेटतो होकारार्थी मुंडी हलवत नकारार्थी वागतो मी तिचा वेडा भाबडा सोन्या जरी बनवाबनवीत मला महारत आहे..!
गोंधळ घालुन हालचाल करत नाही शांततेतील अशांतता माशीला कळत नाही नजर खाली माझं नाटक भारी हा बगळा हुशार आहे..!!
विजय व्यंकटराव चव्हाण नायगाव जि. नांदेड मो. ९०४९६८९७२०
