आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
पुणे: पुणे श्रमिक पत्रकार संघाचे आणि पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे (वय 60 रा. कोथळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे. प्रकाश भोईटे यांनी पुढारी, देशदूत, पुण्यनगरी, देशोन्नती या वृत्तपत्रांमध्ये प्रदीर्घकाळ वार्तांकन केले. सध्या ते दैनिक केसरीमध्ये कार्यरत होते.
त्यांच्या पार्थिवावर रात्री नऊ वाजता कोथळे गाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
शोकाकुल राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश सर्व पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य



















