!
प्रवीण पप्पू शिंदे
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला येथे दिनांक २०/०२/२०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान घडलेली घटना ही संपूर्ण महाराष्ट्राला आणि शिवछत्रपतींच्या विचारांना काळीमा फासणारी आहे. चिखला येथील सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी केवळ शिवरायांचे स्मारक हटविण्याच्या नीच हेतूने मराठा समाजातील बांधवांवर आणि भगिनींवर अमानुष दगडफेक व मारहाण केली. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, या हल्ल्यात भगिनी संजीवनी वाघ यांच्यासह इतर अनेक महिलांना त्यांचे कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली, हा स्त्री-शक्तीचा अपमान आम्ही कदापि खपवून घेणार नाही. ज्या शिवरायांनी स्त्रियांचा सन्मान राखण्याची शिकवण दिली, त्यांच्याच राज्यात अशा प्रकारे महिलांची विटंबना आणि स्मारकाचा अवमान करणारा हा नंगानाच महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे. या भ्याड हल्ल्याचा आणि हीन मानसिकतेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती की, यातील दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी; मराठा समाज किती शांत बसणार?
मराठयांनी पिढ्यानपिढ्या शेती पिकवून अठरापगड जातींच पोट भरून देश, देव, धर्मासाठी रक्त दिलय व आजही मिलिटरीत जाऊन मराठा समाज देशाच्या सिमा अखंड व अभेदय राखणेसाठी रक्त देत आहे,
आमच्या रक्तान लाल पावन भारतभुमीच आमच्याच माता भगिनींचे कपडे फाडून मारहाण केली जातेय!
हयांना एवढी गुर्मी कुठून आलीय,
मराठयांनो जागृत, सावध रहा, सगळा काळच कपटी, पापी, वैरयांचा आला आहे,
मराठयांनो घराघरात, गल्लीगल्ली, आळीत, गावात, तालुक्यात, जिल्हात विचार करा,
हया प्रवृत्ती वेळीच आवरायला एक व्हावे.
एक मराठा
नेक मराठा
#maratha



















