!!जय शिवराय!!
प्रविण पप्पू शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
काल BARTI ऑफिस येथे जाऊन राज्यातून आलेले बऱ्याच कुणबी जात पडताळणी बद्दलच्या केसेस अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. जसे की रामदास जाधव (छत्रपती संभाजीनगर), रंगनाथ जाधव( बीड), संभाजी थिटे (पुणे), ओम देशमुख (वाशीम), प्रल्हादराव दाभाडे (परभणी), संजय उंडरे (वाशी). अधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्हा समितीकडे ह्या केस पाठवून त्या त्वरीत सोडवण्याच्या सूचना केल्या.
तसेच मागील वर्षीच्या प्रलंबित 5700 कुणबी अथवा SEBC जात पडताळणी संबंधित आढावाही अतिरिक्त आयुक्त यांच्या कडून घेऊन विद्यार्थ्यांच्या बऱ्याच अडचणी त्यांच्या समोर मांडल्या. त्यांनी त्यावर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, महाराष्ट्र राज्य यांच्या सोबत एकत्र काम करून प्रत्येक प्रकरणाकडे लक्ष देण्याचे आणि आलेले जात पडताळणी प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
तसे पुण्यातील जात पडताळणी ऑफीस येथे जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या काही बांधवांची प्रलंबित प्रकरणांबाबत चर्चा केली अधिकाऱ्यांनी पुढच्या सुनावणी ती प्रकरणी निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे.
तसेच अंतरवाली सराटी येथील 78 नंबर च्या दिंडी साठी PWD अधिकारी यांची भेट घेऊन पुण्यात मुक्कामी असताना सेंट्रल बिल्डिंग येथे राहण्याच्या सोय करण्याबाबत मागणी केली होती. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांनी काल भेट घेऊन त्यांनी परवानगी दिली
उपस्थित मराठा सेवक
श्री.संतोष बोबडे
श्री. समीर पायगुडे
प्रा. शैलेश भोसले
