*
Jila Pratinidhi Pune
Praveen Pappu Shinde
अथक परिश्रम करून गरिबीवर मात पदावर पोहोचला आहे अजय राजेंद्र कचरे ग्रामीण भागातील व घरातील आजपर्यंत कोणीही उच्च पदावर न पोहोचलेल्या घरात जन्माला आलेला घरची परिस्थिती बेताची आहे अशा परिवारात जन्म घेतला तिथे फक्त दोन वेळेचे जेवण मिळवण्यासाठी आई वडील भाऊ त्यांची धडपड हे सगळेच पाहुन आपल्या परिवाराला या दलदलितुन काढणार व एक दिवस नक्कीच त्यांच्या कष्टाची किंमत सगळा गाव नक्कीच करेल हा आत्मविश्वास घेऊन तो त्याच्या मावशी कडे अहिल्या नगर शहरात आला गेल्या पाच वर्षांपासून तो नित्य नियमाने शिक्षण घेत असताना तीन ते चार वेळा थोड्या मार्कने तो पास नाही होऊ शकला पण हिम्मत नाही हरला तो कायम प्रयत्न करत राहिला हे सगळेच करित असताना खुप अडचणी आल्या पण तो हिंमतीने हारला नाही आणि यश मिळवण्यासाठी जे काही करता येईल यावर मात करून तो आज महसूल अधिकारी पदावर पोहोचला आहे त्यामुळे मुलांनी आईवडिलांच्या कष्टाचे चिझ केले पाहिजे आणि आपल्या गरिबिवर आपणच मात करून आपल्या परिवारासह आपल्या गावाची शान नक्कीच वाढविली पाहिजे अजय ने मेहनतीने हे यश मिळालंय आहे आणि त्यासाठी त्याला आई वडील भाऊ बहीण मावशी काका यांनी संपूर्ण सहकार्य केले आहे आणि त्यांनी पण कोणालाही निराश न करता हे यश मिळालंय आहे अहिल्या नगर शहरातील पत्रकार श्री सुरेश अंधारे यांनी सांगितले की अडचणीत साथ दिली तर नक्कीच मुले ही मोठ्या पदावर पोहचतात फक्त त्यांच्या सोबतीला आपण राहिले पाहिजे, अजयचे सर्व स्तरातून स्वागत आणि कौतुक करण्यात येत आहे


















