“ “रुई (बु.), तालुका- नायगाव (खै.), जिल्हा- नांदेड येथील सुपुत्र आनंद दत्ता दासरवाड”
आंबेगाव प्रवीण शिंदे
रात्रंदिवस उभा राहून इमारतीच्या सुरक्षा दाराशी डोळे लावून बसलेला एक वॉचमन… त्याच्या चेहऱ्यावर झोपेची रेषा असेल पण डोळ्यांत मात्र स्वप्नांची ज्योत पेटलेली होती. हातात काठी होती पण मनात कलमांची तयारी चालू होती. तो वॉचमन नव्हता, तो एक स्वप्न पहाणारा “योध्दा” होता, ज्याने थेट MPSC ची वाट धरली होती.
लोक म्हणायचे, “रात्रभर ड्युटी करून अभ्यास कसा होईल?”
काही जण तर हसतही होते – “सरकारी नोकरी? ते तुझ्या आवाक्याबाहेरचं आहे रे!”
पण त्याने ठरवलं होतं – “माझं आजचं स्थान माझं भविष्य ठरवणार नाही.”
रात्री इमारतीची ड्युटी आणि दिवसा अभ्यास… झोप कमी, आराम नाही, चैन नाही. त्याच्या पाठीशी ना कुठली कोचिंग क्लास होती ना कोणाचं बळ. पण त्याच्या सोबत होती फक्त जिद्द, चिकाटी आणि स्वप्न पूर्ण करण्याची आग.
ज्याच्या हातात बऱ्याच काळापर्यंत चहा आणि वॉचमनच्या वहीच्या नोंदी असायच्या, आज त्याच्याच हातात सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र आहे.
हो, तोच वॉचमन… आता आहे “महसूल सहायक.”
आज त्याने फक्त एक पद मिळवलं नाही,
