सुधीर जाधव
तालुका प्रतिनिधी सातारा
सातारा : दि. २२ जुलै हा दिवस महाराष्ट्रा शासनाने “शुध्द देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन ” म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने काळोशी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व सर्जा राजा गोपालन संस्था काळोशी यांच्या संयुक्त विद्यमाने देशी गोवंश जतन व संवर्धन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्जा राजा गोपालन संस्था काळोशी येथील खिलार जातीच्या गाईंचे पूजन उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ, महीला यांच्या हस्ते करून, कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमांमध्ये कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषयी विशेषज्ञ सागर सकटे यांनी देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले, तसेच डॉ. निलेश शिंदे पशुधन विकास अधिकारी परळी यांनी देशी गोवंश आरोग्य व्यवस्थापन व उत्पादन याविषयी माहिती दिली. संग्राम पाटील कार्यक्रम सहाय्यक यांनी नैसर्गिक शेती मधील देशी गोवंशाचे महत्त्व याची माहिती दिली. शंकर निकम अध्यक्ष सर्जा राजा गोपालन संस्था यांनी संस्थेतील उत्पादनांची माहिती दिली. अॅक्यूपंक्चर तज्ञ वैद्य युवराज जाधव यांनी देशी वंशापासून मिळणाऱ्या आरोग्यदायी उत्पादनांची माहिती दिली.
सदर कार्यक्रमादरम्यान उपस्थित अधिकारी व शेतकरी यांनी प्रक्षेत्र भेटीमध्ये सर्जा राजा गोपालन संस्थेतील निसर्गोपचार केंद्र, चारा उत्पादन प्रक्षेत्र यांची माहिती घेतली. सदर कार्यक्रमासाठी वाघु निकम, जयश्री निकम, मयुरी निकम, ज्योती निकम, मानसिंग धनवडे, स्वाती शेळके, अश्विनी शेळके, लक्ष्मण डफळ, ज्ञानेश्वर निकम, भालचंद्र डफळ, काळोशी व परिसरातील शेतकरी व महिला बहु संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संतोष निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
