*
*संस्कार फाउंडेशनचे संस्थापक अजय घुले यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान*
प्रतिनिधी
राज्य मराठी पत्रकार परिषदेची घोडदौड मोठ्या दिमाखात सुरू असून महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार व पुणे जिल्हा कार्यकारिणी मधील नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम मंचर येथे नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला, येथील स्साई सेंट्रल मॉल येथे सदर नियुक्ती वाटपाचा कार्यक्रम शरद सहकारी बँक संचालक व संस्कार फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि संस्थापक अजय घुले व राज्य मराठी पत्रकार परिषद महा. राज्य उपाध्यक्ष प्रवीण शिंदे विभागीय संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर पाटेकर यांच्या हस्ते संपन्न झाला, राज्य मराठी पत्रकार परिषद चे केंद्रीय अध्यक्ष व संस्थापक मधुसूदन कुलथे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाप्रमाणे पुणे जिल्ह्यातील कार्यकारिणीचे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली..
यावेळी अजय घुले उपस्थित पत्रकार बांधवाचा सन्मान शाल टोपी व गुलाबपुष्प व नियुक्ती पत्र देऊन केला, पत्रकारांनी निर्भीडपणे वाटचाल करत समाजातील प्रलंबित समस्या सोडविण्याकडे लक्ष केंद्रित करावे असे आवाहन याप्रसंगी केले, याप्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून रायचंद शिंदे (नारायणगाव ), पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत शिरतर (आळे ),पुणे जिल्हा कार्याधक्ष अय्युब शेख( कळंब )पुणे जिल्हा संघटक आदिल शेख नारायणगाव ,पुणे -नगर जिल्हा विशेष संघटक नजर अली असगर अली -मंचर,आंबेगाव तालुका अध्यक्ष नवीन सोनवणे (शिंगवे ),आंबेगाव तालुका संपर्क प्रमुख दिनेश बाणखेले (मंचर ),आंबेगाव तालुका उपाध्यक्ष मंगेश कोकणे (डिंभे ),जुन्नर तालुका कार्याध्यक्ष अजित घाडगे (निमगावसावा ),जुन्नर तालुका उपाध्यक्ष मझर तिरंदाज जुन्नर,जुन्नर शहर अध्यक्ष मुबीन जमादार, पिंपरी चिंचवड चिंचवड शहर कार्य अध्यक्ष विलास कोरडे सह अन्य पत्रकार बांधवांची निवड जाहीर करण्यात आली.


















