🚩
*
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
आंबेगाव – खेड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि भक्तीभावाने भरलेली ही आनंदवार्ता आहे.पुणे जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र *भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर* येथे उभारण्यात आलेल्या नव्या दगडी सभामंडपाची नोंद लवकरच *गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स* मध्ये होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भगवान शंकराच्या कृपेने अवघ्या काही महिन्यांत पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे भव्य बांधकाम पूर्णत्वास आले आहे. पूर्णपणे दगडात उभारलेला हा सभामंडप पारंपरिक चुन्याच्या साहाय्याने साकारला गेला असून त्यात देखणे आणि मजबूत स्तंभ उभारण्यात आले आहेत.या वास्तूमुळे मंदिर परिसराला अधिक दिव्यता आणि भव्यता लाभली आहे.
येणाऱ्या *सिंहस्थ कुंभमेळा 2027* च्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले.नव्या सभामंडपामुळे हजारो भक्तांना एकाच वेळी शांततेत बसून दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा आणि स्थापत्यकलेचा जागतिक स्तरावर गौरव होण्याच्या दिशेने टाकलेले हे ऐतिहासिक पाऊल प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
*🔱 हर हर महादेव 🔱*

















