आंनद करूडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
बिलोली तालुक्यातील केसराळी केंद्रांतर्गत येत असलेल्या मिनकी येधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीतील नठगल प्रवेशित विद्यार्थ्यांचे येथील केंद्रामुख शंकर नाईक व मुख्याध्यापक अशोक पैटे यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले मिनकी येथे एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे या शाळेत पहिली ते आठक्पर्यंत वर्ग आहेत. पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेऊन शाळेत प्रवेश केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करत मिठाई भरवत पुष्पहार घालुन
स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख शंकर नाईक, मुखराध्यापक अशोक पेंटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी नाईक, सुदर्शन स्वामी, बी. बी. बेरगर्ट, एच.डी.नाईनवाड, एस. एम. शेकलोड, पी. एन. शिवाचार्य, आर. एल. हांदेशवार, जे. बी. बिरादार संतुबाई गजलवार, मंगल काळे यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते
