*
प्रतिनिधी
केसनंद, वाघोली व मांजरी या तिन्ही गावांचा सुरुवातीला महावितरण चा फिडर एकच होता. त्यामुळे तिन्ही गावांमध्ये कमी दाबाने (लो व्होल्टेज) वीज मिळत होती. तसेच गावांमध्ये झपाट्याने नागरीकरण वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मरवर मोठ्या प्रमाणात लोड आला होता.
यामुळे वारंवार वीज जाणे, कमी दाबाने वीज मिळणे, उपकरणे बंद पडणे अशा अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत होते.
या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन महावितरण कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तिन्ही गावांचा स्वतंत्र फिडर करण्याची मागणी करण्यात आली.
सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केसनंद, वाघोली व मांजरी या तिन्ही गावांचे फिडर वेगळे करण्यात आले. त्यामुळे:
* वारंवार वीज जाण्याचे प्रमाण कमी झाले
* लो व्होल्टेजची समस्या मोठया प्रमाणात कामी झाली
* नागरिकांना नियमित व सुरळीत वीजपुरवठा मिळू लागला
ही कामगिरी गावाच्या विकासासाठी महत्त्वाची ठरली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.




















