१७ जून १६७४ राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ स्मृतीदिन..🙏🚩
राज्यारोहणानिमित्त महाराजांच्या राज्यांत सर्वत्र आनंदोत्सव चालला असतां एक अत्यंत खेदजनक गोष्ट घडून आली, ती अर्थात राजमाता जिजाऊ मातुश्रींचे देहावसान होय. ज्या परमपूज्य व अत्यंत प्रेमळ मातेच्या शिक्षणाने, उपदेशाने व सतत प्रोत्साहनाने हा एवढा प्रचंड उद्योग महाराजांनी हाती घेऊन असा यशोलाभास आणला व स्वपुत्र सर्वत्र विजयी होऊन व राजपदारूढ होऊन नूतन शककर्ता झाल्याने ज्यांच्या आनंदास पारावार नाहीसा झाला होता, ती हा सुखसोहळा पाहावयास फार दिवस जिवंत राहिले नाही. राज्याभिषेक समारंभ आटोपल्यावर दहा-बारा दिवस झाले नाहीत तोच एकाएकी काही विकार होऊन तिचा त्यांत अंत झाला..! ह्या ऐन आनंदभरात असा अकस्मात् मातृवियोग झाल्यामुळे महाराजांना अतोनात दुःख झाले. आपली ऐश्वर्यवृद्धी पाहून ज्यांना वास्तविक समाधान व उत्साह वाटावयाचा ती आपली अत्यंत प्रिय जननी आपणास सोडून गेल्यामुळे त्यांस सर्व ऐश्वर्य शून्यवत् वाटू लागले. महाराजांच्या ठायीं मातृभक्ती किती निःसीम होती हे ह्या समयी लोकांच्या नजरेस उत्तम प्रकारे आले. मातेची उत्तरक्रिया त्यांनी लक्षावधी रुपये खर्चून यथासांग केली व ते पर्जन्याचे चार महिने त्यांनी रायगडावरच राहून मातृशोकात घालविले..
लाखो-करोडोंचा हा महाराष्ट्र दुखाच्या छायेखाली गेला स्वराज्याची प्रेरणाच स्वराज्यातून निघून गेली शिवबा पोरका झाला, बाळशंभू पोरका झाला, रायगड पोरका झाला, सह्याद्री पोरका झाला, स्वराज्य पोरकं झालं आधार गेला आता उरला फक्त घनदाट अंधार…
याच “जिजाऊ” ज्यांच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती,
याच “जिजाऊ” ज्यांनी घडविले “राजे शिवछत्रपती”…
“या मातेनं एकाच घडविला आणि तोही इतिहासच झाला”
――――――――――――
राजमाता माँसाहेब जिजाऊंना स्मृतीदिना निमित्त भावपूर्ण आदरांजली आणि मानाचा मुजरा..🙏💐🚩
