🤣✅ !
✍️ (मराठा सेवक महाराष्ट्र राज्य) प्रवीण शिंदे
माझ्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून जिल्हा जात पडताळणी समितीकडून नियम 17(3) अन्वये प्रकरण बंद करण्यात आले होते. परंतु कायद्याचा सखोल अभ्यास, सबळ कारणे व अतिरिक्त पुरावे सादर करून तेच नियम 17(3) वापरून फाईल पुन्हा उघडण्यात आली आणि अखेर जात वैधता प्रमाणपत्र मिळाले.
📌 महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे :
1️⃣ नियम 17(3), महाराष्ट्र जात प्रमाणपत्र नियम 2012
जर प्रकरण अपूर्ण माहिती/पुराव्याअभावी बंद केले असेल, तर अर्जदारास सबळ कारणे व नवीन/अतिरिक्त पुरावे सादर करून तेच प्रकरण पुन्हा उघडण्याचा अधिकार आहे.
👉 म्हणजे 17(3) हा “अंतिम दरवाजा” नसून, योग्य कारण असल्यास पुनर्विचाराचा मार्ग खुला आहे.
2️⃣ शासन निर्णय दिनांक 22/08/2007
कुटुंबातील एखाद्या सदस्याला जात वैधता (Validity) मिळालेली असल्यास —
👉 रक्तसंबंध सिद्ध झाल्यावर, इतर सदस्यांकडून अनावश्यक अतिरिक्त पुरावे मागू नयेत.
👉 एका महिन्याच्या आत जात वैधता देणे अपेक्षित आहे.
⚖️ कायदा स्पष्ट आहे —
कुटुंबात आधीच वैधता असल्यास, नव्याने अर्जदाराला अनावश्यक त्रास देणे किंवा पुरावे मागत राहणे योग्य नाही.
📄 वर दर्शविलेल्या प्रमाणपत्रात (अर्जदाराची ओळख गोपनीय ठेवण्यासाठी ब्लॅक मार्क केलेले आहे) स्पष्टपणे दिसते की —
नाकारलेले प्रकरण योग्य कायदेशीर मांडणीमुळे अखेर मंजूर झाले.
🔎 संदेश सर्व नागरिकांसाठी :
17(3) म्हणजे कायमस्वरूपी नकार नाही.
सबळ कारणे व कायदेशीर तरतुदी मांडल्यास न्याय मिळू शकतो.
शासन निर्णय 22/08/2007 हा अत्यंत प्रभावी संरक्षणात्मक निर्णय आहे.
📢 हक्कासाठी सजग राहा, कायदा जाणून घ्या आणि योग्य मार्गाने लढा —
न्याय मिळतो, जर आपण ठाम राहिलो तर.


















