*
प्रवीण पप्पू शिंदे
महाराष्ट्रातील तमाम रामोशी, बेरड, बेडर समाज बांधवांनी प्रत्येक तालुका जिल्हा स्तरावर निषेध आंदोलन करावे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये या जुन्नरच्या आमदार शरद सोनवणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा.
मुळात गुन्हेगाराला जात ,धर्म नसतो,समाजात पुढारलेला सर्व रामोशी समाज व फासेपारधी समाज यांचेकडे सतत चोरी करणारे लोक या भावनेने पहाणारे जुन्नरचे नालायक आमदार शरद सोनवणे यांनी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत,रामोशी व फासेपारधी समाजाचं योगदान छत्रपती शिवरायांच्या काळापासून स्वातंत्र्य लढ्यात व आता सामाजिक चळवळीत अधिक राहीलेलं आहे हे संकुचित प्रवृत्तीचे लबाड ढोंगी असलेले शरद सोनवणे विसरलेले दिसतात.
ते आता माथेफिरूसारखे बोलू लागले आहेत,त्यांनी समस्त रामोशी व फासेपारधी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत,थेट समाज चोरी करतो आम्हाला त्रास देतो असा आरोप केला आहे,आम्ही समस्त समाजबांधव या शरद सोनवणेचा जाहीर निषेध करतो..त्यांनी तात्काळ समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही,.
समस्त रामोशी व फासेपारधी समाजबांधव
पुणे ,नगर नाशिक
विभाग.
श्री दौलतनाना उमाजी शितोळे
(संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना)
