*
*समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन*
ज्ञानेश्वर पाटेकर
*नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी*
असा संदेश संपूर्ण विश्वाला देऊन भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतभर मिरवणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथील सर्व शिंपी समाज संस्था यांच्या आयोजनातून संत शिरोमणी नामदेव महाराज व त्यांचे कुटुंबीय आणि संत श्री जनाबाई महाराज यांचा षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सव अर्थात ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे भव्य आयोजन रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे करण्यात आले असून समाजातील सर्व बांधवांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे आवाहन नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर तसेच पुणे शहराध्यक्ष संदीप लचके पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष एकनाथ सदावर्ते यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील सर्व शिंपी समाज संस्था आणि सर्व समाज बांधवांकडून करण्यात आले आहे, ह भ प मुकुंद महाराज नामदास संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणारा असून सकाळी नऊ ते दहा श्री विठ्ठल आणि श्री नामदेव महाराज अभिषेक आणि महापूजा,११ ते ४ समाजासाठी महत्वपूर्ण योगदान देऊन वय वर्षे ८१ पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा, धान्य तुला, दुपारी ४ ते ६ मोगरा फुलला हा सुंदर अशा भक्तीगीतांचा कार्यक्रम संध्याकाळी ६ ते ८ पुरस्कार सोहळा या कार्यक्रमांमध्ये सध्या मिझोराम येथे कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी रोहन प्रमोद बोत्रे यांना समाज रत्न पुरस्कार व व माजी आमदार प्रकाश देवळे यांचा समाज भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, सदर कार्यक्रमासाठी उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, अण्णा बनसोडे उपाध्यक्ष विधानसभा, माधुरी मिसाळ राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य या सर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत,महाप्रसाद झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
