#
प्रवीण पप्पू शिंदे
राजकारणात सत्तेचा वापर सामान्यांना दाबण्यासाठी करायचा की न्याय देण्यासाठी? याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब! २००६ सालच्या उस्मानाबाद नगर परिषद निवडणुकीतील एक थरारक प्रसंग आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
जेव्हा मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्र्यांचा ‘तो’ आदेश फिरवला!
वॉर्ड क्रमांक २६ मधून काँग्रेसचे उमेदवार सय्यद खलील यांचा निसटता पराभव झाला. मात्र, विजयी उमेदवाराचे बेकायदेशीर बांधकाम जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध ठरवून त्यांना अपात्र केले. त्यावेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आपल्या पदाचा वापर करून विलासरावजींकडून या निर्णयाला स्थगिती मिळवली होती.
‘ती’ पाठीवरची थाप आणि १०० हत्तींचे बळ!
सय्यद खलील यांनी जेव्हा ही अन्यायाची कैफियत विलासरावजींकडे मांडली, तेव्हा साहेबांनी तत्काळ मंत्रालयात सुनावणी लावली. भर मीटिंग हॉलमध्ये खलील यांना जवळ बोलावून “जवळ उभे राहा” असे सांगत धीर दिला. विरोधकांचे म्हणणे ऐकले, पण सत्याची बाजू भक्कम असल्याने क्षणात निकाल दिला – “स्थगिती उठवण्यात येतेय आणि अपील रद्द!” त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत खलील साहेब १ हजार मतांनी विजयी झाले.
“साहेबांच्या पाठीवरच्या त्या थापेने अंगात १०० हत्तींचे बळ संचारायचे. आज सत्तेच्या जोरावर पक्ष फोडणाऱ्यांना यशवंतराव चव्हाणांचा वारसा आणि विलासरावांची सुसंस्कृत संस्कृती कधीच समजणार नाही.”
— सय्यद खलील (प्रदेशाध्यक्ष, विचार विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस)
सत्तेचा उन्माद विरुद्ध महाराष्ट्राची संस्कृती
आज राजकारणात इडी, सीबीआय आणि पैशाचा जो नंगानाच सुरू आहे, त्यावरून खलील सर स्पष्ट इशारा देतात की, रावणाची सोन्याची लंका असो वा कौरवांचा वंश, अहंकाराचा नाश अटळ असतो. भाजपच्या काही नेत्यांनी जो सत्तेचा उन्माद दाखवला आहे, त्याला लातूरकर येत्या निवडणुकीत नक्कीच चोख उत्तर देतील



















