*
प्रवीण पप्पू शिंदे
पुणे व नगर विभाग टेलर असोसिएशनचा शुक्रवार दिनांक ९ जानेवारी रोजी मंचर या ठिकाणी भव्यदिव्य स्वरूपात मेळावा व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व टेलर व्यवसायासाठी केंद्रीय सुष्म ,लघु व मध्यम उद्योग खात्याचे सचिव संदीप पोखरकर कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्याला केंद्र सरकारच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करणार असून हा कार्यक्रम उद्या ठीक दहा वाजता सुरु होणार आहे. कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात असणार असून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या पहिल्या दहा टेलर बांधवांना स्टीम प्रेस इस्त्री किंमत २७०० रुपये तसेच नंतरच्या पंधरा टेलर बांधवांना पंधराशे रुपये किमतीचे टेलरिंग मटेरियल लकी ड्रॉ मध्ये मिळेल,तसेच नंतरच्या दहा टेलर बांधवांना एक कटिंगची कैची मिळेल. असे एकूण ३५ उपस्थित राहणाऱ्या टेलर बांधवांना या लकी ड्रॉचा फायदा घेता येईल तसेच केंद्र सरकारच्या लघु आणि सूक्ष्म उद्योग या खात्यामध्ये टेलर बांधवांचा व्यवसाय येतो त्यासाठी केंद्राचे लघु आणि उद्योग खात्याचे सचिव कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार असून भविष्यात टेलर बांधवांना या सचिवांमार्फत काहीतरी योगदान देता येईल त्यामुळे जास्तीत जास्त टेलर बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे नगर टेलर असोसिएशनचे अध्यक्ष रोहन बांगर तसेच पुणे नगर टेलर असोसिएशन संचालक शरद टेमगिरे यासह संचालक मंडळाने मंडळाने केले आहे




















