*
प्रवीण पप्पू शिंदे
अखिल भारतीय मराठा महासंघ व स्व रखमाबाई ताडगे प्रतिष्ठानच्या सलग १९ व्या वतीने दिनदर्शिकेचे प्रकाशन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री माननीय मुरलीधर( अण्णा) मोहोळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विकास दांगट, मराठा महासंघाचे राजू सुपेकर उपस्थित होते,तसेचं सकाळच्या वर्धापन दिनानिमित्त सकाळचे संपादक सम्राट फडणीस व साम वाहिनीचे निलेश खरे,संभाजी पाटील व मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर , संतोष गवळी यांच्या शुभहस्ते दरवर्षी प्रमाणे दिनदर्शिका चे प्रकाशन या मान्यवरांच्या हस्ते झाले तसेच यावेळी प्रविण पाटील, उप महासंचालक, नार्कोटिक्स पुणे,
अनील सावळे उपसंपादक सकाळ यांना नवीन दिनदर्शिका देण्यात आली. तसेच यावेळी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक श्रीकांत जगताप यांचा नवीन दिनदर्शिका देऊन मराठा महासंघातर्फे सत्कार करण्यात आला…



















