जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
माननीय महोदय….दरवर्षीप्रमाणे अखिल भारतीय मराठा महासंघ व स्वर्गीय रखमाबाई ताडगे प्रतिष्ठानच्या वतीने सलग 19 व्या दिनदर्शिकाचे प्रकाशन सकाळ वृत्त समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त डीपी रोडवरील पंडित फॉर्म येथे सकाळचे मुख्य अधिकारी सम्राट फडणवीस, साम वृत्त वाहिनीचे निलेश खरे, मराठा सेवा संघाचे वरिष्ठ पदाधिकारी राजेंद्र कुंजीर, सकाळचे संपादक माननीय संभाजी पाटील, परशुराम पवार यांच्या शुभहस्ते झाले… दरवर्षी वर्षाच्या पहिल्या दिवसाला म्हणजेच एक जानेवारीला दिनदर्शिका प्रकाशन होत असते.. या दिनदर्शिका मध्ये महाराष्ट्र सरकारच्या मराठा समाजाबद्दलच्या काही योजना बद्दल माहिती देण्यात आली.. मुख्यतः छत्रपती शाहू महाराज विकास व संशोधन संस्था (सारथी) ची माहिती देण्यात आली, त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ची सद्य परिस्थिती याची माहिती दिली आहे, तसेच महाराज सरकारने मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीगृहाची (औंध) माहिती देण्यात आली…. दरवर्षी 2000 प्रति दिनदर्शिकाचे मोफत वाटप केले जाते…….



















