जिदा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सौ. काजल भणगे यांना उमेदवारी तिकीट मिळाले ही अत्यंत आनंदाची, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. समाजकार्याची जाणीव, स्पष्ट विचारसरणी आणि लोकहिताची तळमळ असलेले त्यांचे नेतृत्व निश्चितच नवी मुंबईच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल.
मराठा समाजाच्या सक्षम, कर्तबगार व धाडसी महिला उमेदवार म्हणून सौ. काजल भणगे या आज अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या सक्रिय व निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून त्यांनी आजवर समाजासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या वाटचालीतून महिलांचे राजकीय नेतृत्व अधिक बळकट होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या वतीने सौ. काजल भणगे यांना मनःपूर्वक शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन व भावी कार्यासाठी सदिच्छा! जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत त्या न्याय, विकास व समतेचे राजकारण यशस्वीरीत्या पुढे नेतील, हीच अपेक्षा.
ताईंचा विजय निश्चितच समाजाच्या प्रगतीचा विजय ठरो! 💐



















