*
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
—————————
दिनांक: २९.१२.२०२५
*महाळुंगे पडवळ*: येथील हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाच्या नियोजित नवीन इमारतीच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी,ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या *हुतात्मा बाबू गेनू विद्या विकास फाउंडेशन* या ट्रस्टच्या माध्यमातून
*₹ ५०, ००,०००.००*
( *पन्नास लाख रुपये* )चा धनादेश विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक
श्री. एस्. के. काळे सर यांचेकडे आज सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी, अनेक ग्रामस्थ आणि हुतात्मा बाबू गेनू विद्या विकास फाउंडेशन या ट्रस्टचे संचालक हजर होते.
विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी रयत शिक्षण संस्थेने आपल्या पहिल्या टप्प्यातील योगदानापैकी, २५ लाख रुपये हुतात्मा बाबू गेनू विद्यालयाच्या बॅंक खात्यात नुकतेच जमा केले आहेत.
*हुतात्मा बाबू गेनू विद्या विकास फाउंडेशन* हा ट्रस्ट मागील काही वर्षांपासून या नवीन इमारतीच्या उभारणीसाठी प्रयत्न करत आहे.
विद्यालयाची ही नवीन इमारत एकूण तीन टप्प्यात बांधण्यात येणार असून सुमारे तीन महिन्यांपूर्वी पहिल्या टप्प्यातील बांधकामास संस्थेकडून मंजुरी मिळाली आहे .
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य; मा. ना. दिलिपरावजी वळसे पाटील यांचे शुभहस्ते दि.१७.११.२०२५ रोजी नियोजित वास्तूच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले.
आज हुतात्मा बाबू गेनू विद्या विकास फाउंडेशन या ट्रस्टकडून, पहिल्या टप्प्यासाठी लागणाऱ्या *आपल्या योगदानापैकी* ५० लाख रुपये चेकद्वारे माननीय मुख्याध्यापक श्री. काळे सर यांचेकडे सुपूर्द केले गेले.
पुढील दोन टप्प्यातील इमारत बांधकामाचा खर्च आणि जमीन सपाटीकरण, लॅंड स्केपिंग, सुरक्षा भिंत, अंतर्गत रस्ते, खेळाचे मैदान, पोर्च, प्रवेशद्वार, पार्किंग इत्यादी कामांसाठी लागणारी आर्थिक तरतुद उभी करण्यासाठी ग्रामस्थ , माजी विद्यार्थी आणि ट्रस्टचे संचालक सातत्याने प्रयत्न करत आहेत.
या नियोजित वास्तूच्या बांधकामास जानेवारी २०२६ च्या अखेरीस सुरूवात होण्याचा विश्वास यावेळी माननीय मुख्याध्यापक श्री एस् के काळे सर यांनी व्यक्त केला.
💐💐💐💐💐💐💐💐



















