जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
पंढरपूर ते इंग्लंड अशी वारी घेऊन गेलेले अनिल खेडकर यांचा अखंड भारत परिषद या संस्थेतर्फे सन्मान केला गेला!
सदरील कार्यक्रमाला ह भ प कीर्तन केशरी चंद्रकांत जी वांजळे महाराज पुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी ताडगे, साई एज्युकेशन सोसायटीचे पुणे चे अध्यक्ष श्री सागर जी शेडगे, अपेक्षा विशेषांकाचे संपादक दत्तात्रय उभे, संगीत विशारद यादवराज फड यासह इतर मान्यवर उपस्थित होते, .ज्या गोऱ्या इंग्रजांनी आपल्या देशावरती दीडशे वर्ष राज्य केलं त्याच इंग्लंडमध्ये एक मराठी माणूस उद्योजक म्हणून उभा राहतो आणि तिथे वास्तव्यास असलेल्या 5000 मराठी कुटुंबाला एकत्र करून त्यांना पंढरपूरची वारी उपलब्ध करून देण्याचे हेतूने इंग्लंडमध्येच दहा एकर मध्ये विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बांधण्याचा संकल्प करतो, आणि त्याची सुरुवात पंढरपूर येथून करतो, 14 एप्रिल 2025 रोजी पंढरपूर येथून गाडी चालवत केलेला प्रवास आठरा हजार किलोमीटर असा होता. हा पूर्ण प्रवास करण्यासाठी 22 देशाच्या सीमा पार करून जाण्यासाठी पूर्ण 70 दिवसांचा अवधी लागला 70 दिवसानंतर इंग्लंडमध्ये पंढरपूर नेलेल्या पादुकांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करून लंडन या शहरांमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रमाची प्रस्तावना अखंड भारत परिषदेचे अध्यक्ष असे रत्नाकर केंद्रे यांनी केली, सर्व मान्यवरांचे मनोगत पार पडले, सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सगर यांनी केले व आभार प्रदर्शन अपेक्षा विषयकाचे संपादक श्री दत्तात्रेय उभे साहेब यांनी केले.



















