*
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
– पुणे – अहिल्यानगर रोडवरील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे काल सायंकाळी वाडा पुनर्वसन फाट्याजवळ भीषण अपघात होऊन श्रीरामपूर येथील तरूणाचा मृत्यू झाला आहे.
वाडा पुनर्वसन फाट्याजवळ भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात मोठ्या वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील मूळचा श्रीरामपूर शहरातील उबेद सलमान शेख या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.तर मोटारसायकल वरील दुसरा तरूण शिवसागर आदिक हा गंभीर जखमी झाला आहे. पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी हे दोघे तरूण विद्यार्थी पुण्यात गेले होते असे समजत.



















