जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
*२६ डिसेंबर इ.स.१५३०*
मोगल सत्तेचा संस्थापक मोहम्मद झहीरुद्दीन बाबर याचा मृत्यू. इतिहासातील क्रूरकर्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तैमूरलंगाचा हा वंशज त्याच्या पूर्वजांप्रमाणेच क्रूर असाच होता.
१५२८ मध्ये बाबराने अयोध्येतील राममंदीर पाडले आणि मशीद उभारली आणि तीच ती वादग्रस्त अशी “बाबरी मशीद”
इब्राहिम लोदी आणि राणा सांगाच्या पराभवानंतर बाबरने भारतात मुगल साम्राज्याची स्थापना केली आणि आग्रा राजधानी केली. त्याआधी सुलतानांची राजधानी दिल्ली होती. मात्र बाबरने ती राजधानी केली नाही, कारण तो पठाण होता आणि तुर्कांची सत्ता त्याला मान्य नव्हती. प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने बाबरला दिल्लीपेक्षा आग्रा योग्य वाटले. भारतात मुस्लिम शासकांना ‘सुलतान’ म्हटले जात होते, बाबरने स्वतःला ‘बादशहा’ घोषित केले. बाबर फक्त चार वर्षे भारतावर राज्य करु शकला. त्याचा मृत्यू २६ डिसेंबर १५३० मध्ये आग्रा येथे झाला.
*२६ डिसेंबर इ.स.१६६५*
छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांसोबत मिळुन विजापुरकरांचे महत्वाचे ठाणे असलेले मंगळवेढ़े जिंकुन घेतले.
*२६ डिसेंबर इ.स.१७१५*
चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करुन ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली.



















