जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
श्री. संजय आल्हाट यांची
अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती (SC–ST) प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
हार्दिक हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्यायाच्या विचारधारेवर ठाम निष्ठा ठेवून, तसेच स्वर्गीय रामविलास पासवान साहेब यांच्या संघर्षशील, लोकाभिमुख व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाच्या प्रेरणेतून, कोणत्याही पदाची, सत्तेची अथवा वैयक्तिक लाभाची अपेक्षा न ठेवता, गेल्या अनेक वर्षांपासून सामान्य, कष्टकरी, वंचित, दुर्बल व उपेक्षित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे, अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणारे आणि जनतेशी थेट नाळ जपणारे खरे लोकनेते म्हणजे श्री. संजय आल्हाट होत.
महाराष्ट्रात, विशेषतः पुणे जिल्ह्यात, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचावा, शिक्षण, रोजगार, सन्मान व सुरक्षितता मिळावी यासाठी आपण रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष, प्रशासनापुढे मांडलेले प्रश्न, तसेच जनतेच्या दुःखात सहभागी होऊन दिलेला आधार हे आपल्या कार्याचे जिवंत उदाहरण आहे. आपल्या निःस्वार्थ सेवाभावी वृत्तीमुळे आणि प्रामाणिक कार्यशैलीमुळे आज आपल्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास म्हणजेच आपल्या कार्याची पावती आहे.
SC–ST प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना आपण या पदाला केवळ मानाचे नव्हे, तर संघर्षाचे, कार्याचे व परिवर्तनाचे प्रभावी व्यासपीठ बनवाल, समाजातील ज्वलंत प्रश्नांना प्राधान्य द्याल, तरुणांना दिशा द्याल आणि संघटन अधिक मजबूत करून लोक जनशक्ती पार्टीचा आवाज घराघरात पोहोचवाल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
आपल्या नेतृत्वाखाली सामाजिक न्यायाची चळवळ अधिक वेग घेईल, वंचितांच्या हक्कांना बळ मिळेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात लोकाभिमुख, मूल्याधिष्ठित व संघर्षशील नेतृत्वाची नवी ओळख निर्माण होईल, हीच अपेक्षा.
आपली ही नवी जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी
अखंड ऊर्जा, उत्तम आरोग्य व अपार यश लाभो,
आपल्या हातून समाजहिताचे व राष्ट्रहिताचे भरीव कार्य घडो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना व मनःपूर्वक शुभेच्छा.
शुभेच्छुक,
श्री शरद राव टेमगिरे


















