*
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
*पारनेर तालुक्यातील किन्ही येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कै. भागूबाई विश्वनाथ खोडदे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने १० लाख रुपयांचा धनादेश तर १५ लाख रुपये एफडी असे एकूण २५ लाख रुपयांची आर्थिक मदत आज पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.*
*या मदतीमध्ये १० लाख रुपयांचा धनादेश व १५ लाख रुपये एफडी स्वरूपात कुटुंबीयांच्या नावे देण्यात आले. या प्रसंगी आमदार दाते यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.*
*यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत चेडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (पारनेर प्रादेशिक) श्री. गजानन धाडे, भाळवणी वनपाल श्री. के. एस. साबळे, कान्हूर पठार वनरक्षक श्री. एन. व्ही. बडे, भाळवणी वनरक्षक श्री. बी. एस. दवणे, चालक दिगंबर विरोळे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*या मदतीमुळे शोकाकुल कुटुंबाला मोठा आधार मिळाल्याची भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली.*



















