*
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
🤲 *1) भीक मागण्यावर बंदी येणार*
राज्य सरकारने भीक मागण्याला बेकायदेशीर ठरवणारा विधेयक मंजूर केला आहे.
भीक मागण्यावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
समाजहितासाठी पुनर्वसनाची तरतूदही आहे.
विधेयकाबाबतची अंतिम बैठक हिवाळी अधिवेशनात होणार आहे.
—
👩🧑 *2) ‘लाडकी बहीण’ योजनेत पुरुषांना ५ हजार कोटी?*
योजनेत फसवणुकीची प्रकरणे आढळली असून काही अर्ज पुरुषांचे निघाले.
२.६९ कोटी अर्जांपैकी काही चुकीचे असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
चुकीने मिळालेल्या लाभाची दोन महिन्यांत वसुली सुरू आहे.
लाभार्थ्यांची पडताळणी अधिक कडक करण्याचे निर्देश.
—
🚗⚡ *3) आठ दिवसांत ई-वाहनांचा टोल थांबवा*
ई-वाहनांवरील टोलमुक्ती धोरण लागू न झाल्याने अध्यक्षांची नाराजी.
परिवहन विभागाला ८ दिवसांत टोलवसुली थांबवण्याचा आदेश.
ई-वाहनांची ओळख पटवण्यासाठी डेटा-समन्वय प्रक्रिया गतीने करण्याची सूचना.
चार्जिंग स्टेशनच्या कमतरतेवर त्वरित उपायांची मागणी.
—
🚫🍂 *4) गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांवर ‘मकोका’ लागू*
गुटखा उत्पादन-विक्रीवर गुन्हेगारी आळा घालण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय.
यामुळे गुटखा-सुगंधी सुपारी विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणार.
अवैध गुटखा विक्रीतून वाढणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना.
शाळा-महाविद्यालय परिसरातील बंदीची आता कठोर अंमलबजावणी.



















