जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
*भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी साठी धगधगत्या स्वातंत्र्यकुंडात ज्यांनी*
*आत्मबलीदान केले असे डि पी वाडी , चासकर चाळीत रहाणारे थोर हुतात्मा बाबू गेनू यांचा आत्मबलीदान दिन १२ डिसेंबर रोजी आहे, त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी प्रतिवर्षी ११ डिसेंबर रोजी म्हाळुंगे पडवळ या त्यांच्या जन्मगावा वरून हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठान च्या वतीने भव्य प्राणज्योत मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते*
*यावर्षीही गुरूवार दि.११ डिसेंबर रोजी प्राणज्योत मिरवणुकीचे आयोजन केले आहे, सकाळी १०-वा.काळबादेवी ( जिथे हुतात्मा बाबू गेनू यांनी आत्मबलीदान केले) येथून ज्योतीचे पूजन करून सकाळी ११- वा. त्यांच्या डि पी वाडी, येथील निवासस्थानी प्राणज्योत नेण्यात येईल व नंतर श्री कापरेश्वर मंदिर पटांगणात थोड्या वेळासाठी ठेवून नंतर पुढे कामगार स्टेडियमवर प्रस्थान करतील*,
*या प्राणज्योत मिरवणुकीचे स्वागतासाठी व हुतात्मा बाबू गेनू यांना अभिवादन करण्यासाठी विभागातील सर्व नागरिकांनी गुरूवार दि.११ डिसेंबर रोजी सकाळी ठिक १०-३० वा श्री कापरेश्वर मंदिर येथे उपस्थित रहावे असे आवाहन हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठान यांनी केले आहे*
🙏🙏 *सर्वांनी अवश्य यावे*. 🙏🙏



















