*
ज्ञानेश्वर पाटेकर
जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले
तोची साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा ..
या उक्ती प्रमाणे
राजेंद्र (अण्णा) अमृतराव सातव पाटील मा. उपसरपंच वाघोली व सौ.जयश्री राजेंद्र सातव पाटील मा. सरपंच वाघोली यांनी अत्यंत गरिब परिस्थितीतून उभा राहिलेल्या लोहगावच्या पै. सनी फुल माळी याने एशियन युथ गेम्समधील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावले आहे.
त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सौ. जयश्रीताई राजेंद्र सातव पाटील यांनी अभिनंदन करून “फुल ना फुलाची पाकळी” म्हणून धनादेश देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सातव पाटील यांनी आपल्या क्रीडा क्षेत्रातील प्रेमाविषयी एका खेळाडूसाठी केलेल्या या कार्याचे सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे


















