ज्ञानेश्वर पाटेकर
जिल्हा परिषद सदस्यपदाची निवडणूक लढणार म्हणजे लढणारच आहे! असा ठाम निर्धार माध्यमांशी बोलताना लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांनी व्यक्त केला आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षणानंतर लोणीकंद–पेरणे गट मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.
माझा उद्देश सत्तेचा नाही, सेवाभावाचा आहे. मी या भूमीचा मुलगा आहे, म्हणून लोकांसाठी झटणं माझं कर्तव्य आहे. विकास, शिक्षण, रोजगार आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर ठोस योजना घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे.


















