*
ज्ञानेश्वर पाटेकर
वाघोली राहू रस्त्यावर केसनंद मधील शिवाजी महाराज चौकाकडून बोल्हाई गावाकडे जाताना रस्त्याच्या कॉर्नर वर अत्यंत धोकादायक अवस्थेमध्ये महावितरणची डीपी असून या चौकामध्ये ट्रॅफिक ची समस्या वारंवार गंभीर अवस्थेमध्ये असते अशा परिस्थितीमध्ये कॉर्नरवर ही डीपी असल्यामुळे मोठी वाहने वळण घेताना ह्या डीपीला धक्का लागून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, या चौकातून पुणे, सोलापूर, अहिल्यानगर आणि सातारा या चार जिल्ह्यांकडे रस्ता जात असल्यामुळे शिवाजी महाराज चौक कायम वाहतूक कोंडी साठी कुप्रसिद्ध झाला आहे, रस्ता रुंदीकरण किंवा उड्डाणपूल व्हावा अशी नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी असून अशा परिस्थितीमध्ये धोकादायक डीपीची भर पडली आहे महावितरणने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन ही डीपी त्वरित स्थलांतरित करावी अशी मागणी नागरिकांकडून होत असून याची खबरदारी न घेतल्यास भविष्यात फार मोठा अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे
*कोट.*
डीपी स्थलांतरित करण्यासाठी महावितरण ला वेळोवेळी सूचना देण्यात आल्या असून पर्यायी जागेचा शोध सुरू आहे, पर्यायी जागेची व्यवस्था झाल्यास डीपीचे त्वरित स्थलांतर करण्यात येईल.. विशाल हरगुडे पाटील सरपंच ग्रा. केसनंद
….
पर्यायी जागेची व्यवस्था होईपर्यंत महावितरणने या ठिकाणी जाळी किंवा तारेचे कंपाउंड बसविण्याची व्यवस्था केल्या संभाव्य अपघातापासून नागरिकांची सुटका होईल, महावितरण मे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.. श्रीकांत पाटोळे उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस
..
डीपी इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी जागेची गरज असून जागा उपलब्ध होत नसल्यामुळे सध्यातरी काहीच पर्याय नाही इतरत्र जागा उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी डीपी नक्कीच स्थलांतरित करू..
अरुण पुजारी सहायक अभियंता लोणीकंद महावितरण


















