आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे तुझ्या चरणाची चंद्रभागा आज मी बांध घालून अडवतोय. त्याच उजनीने आज लाखो कष्टकरी वारकऱ्यांच्या घरात सुखाची भाकरी दिली. चंद्रभागा अडवणाऱ्या यशवंतरावांना त्यावेळी कुणीही नास्तिक, निधर्मी, वारकरी विरोधी म्हणले नाही कारण तो जनसेवेला ईश्वरसेवा समजून जगणारा विवेकी कालखंड होता.
आज तपोवनात हजारो वृक्षांची कत्तल करून कुंभमेळ्यासाठी जागा तयार करणाऱ्या फडणवीसांनी साठ वर्षे शेतकऱ्यांच्या घरात समृद्धीची वारी आणणाऱ्या पवारसाहेबांना नास्तिक, निधर्मी, वारकरी विरोधी म्हणून आपल्या संस्कारांची उधळन केली आहे. पवारसाहेबांनी आपला देवधर्म कधीच उंबऱ्याच्या बाहेर काढला नाही. पवारसाहेब तुमच्यासारखे देखल्या देवा दंडवत करुन समाजमाध्यमांवर दाखवत फिरले असते तर आज तुम्ही पिशवीत शिधा भरून कुठेतरी मंगलअष्टका म्हणत असता
प्रवीण पप्पू शिंदे. राज्य उपाध्यक्ष राज्य मराठी पत्रकार परिषद


















