…
प्रवीण पप्पू शिंदे
** पुलवामा एक घाला **
दिली आहुती ज्यांनी,मातीसाठी भारत देशाच्या
अजूनही भळभळती,हिमगिरीच्या त्या जखमा
बलिदानातून जवानांच्या,वाहती धारा स्फूर्तीच्या
प्रश्न सतावतो मनी?घडला कसा हा पुलवामा ll १
पहाट होता ताफ्यावर,भ्याडानी घातला घाला
हिमवर्षावात गोठल्या होत्या,जखमांच्या कळा
भ्याडाचे हल्ल्याने,कित्येकांचे संसार तुटले पुरे
विरपुत्रांच्या रक्ताने,स्तब्ध झाले खळखळणारे झरे ll २
नाही विरले धुळीत ते रक्त,उभे आजही लक्ष देशभक्त
अनेकदा शत्रूला दाविले,आमुचे बाहू किती सशक्त
ना समजती लोकधार्जीने,अन्नपाणी आमुचे खाती पीती
गळ्यात पट्टा ज्याचा,त्यालाच कसे ते का विसरती ll ३
कशा सुखतील जखमा,अजूनही त्या ओल्या
काळीज जळते पाहून,निधड्या छातीच्या चिंधड्या
झाले वीर शहीद,जन जन झाले होते हैराण
पुलवामाच्या शूर वीरांना,शतदा माझा सलाम
शतदा माझा सलाम


















