*
प्रवीण पप्पू शिंदे
महाराष्ट्राच्या राजकारणात कामाचा माणूस म्हणून ज्यांनी आपल्या कार्याचा अढळ ठसा उमटवला असे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनातील अनमोल क्षण छायाचित्र आणि चित्रिफीतीच्या माध्यमातून जतन करण्याचा एक भावपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला असून गेल्या चार दशकापासून अधिक काळ अजित पवार यांनी राजकीय आणि सामाजिक जीवनात अहोरात्र परिश्रम घेतले सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणारी त्यांची कामाची धडपड रात्री उशिरापर्यंत अखंड सुरू असायची कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते, विकासासाठीची तळमळ आणि जनतेसाठीची बांधिलकी या प्रत्येक क्षणाला इतिहासात स्थान मिळावे हीच प्रकल्पामागची भावना असून अजित दादा पवार यांच्या कार्यकर्त्यांकडे सहकार्यांकडे, स्नेहजनांकडे, मित्रमंडळींकडे त्यांच्या जीवनप्रवासातील अनमोल क्षण छायाचित्र किंवा चित्रफिती जतन झालेले असतील अशी छायाचित्र व व्हिडिओ ourdada@viitindia.org या ईमेलवर व ८८७९८८७००९ (अभिषेक ) यांना पाठविण्यात यावी या उपक्रमामुळे अजित पवार यांच्या कार्याचा समृद्ध दस्ताऐवज तयार होईल राज्यातील तसेच राज्याबाहेरील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आठवणी पुन्हा अनुभवता येतील त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात आणि पुढील पिढीपर्यंत त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग या उपक्रमामध्ये नोंदवावा असे आवाहन विशेष कार्यकारी अधिकारी सुनील मुसळे यांनी केले आहे


















