*
भिवंडी निजामपूर महानगर पालिकेतील निव्रुत माहिती व जनसंपर्क अधिकारी, सहायक शिक्षण आयुक्त सुनील सुंदराबाई धाऊ झळके यांची ट्रायबल फोरम कोकण विभागाच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.ही नियुक्ती ट्रायबल फोरमचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ऍड. प्रमोद घोडाम यांनी केली आहे.
सुनील झळके महानगरपालिकेमध्ये कार्यरत असतांना महाराष्ट्र शासनाच्या, मराठी भाषा विभागाच्यावतीने जाहीर झालेल्या मराठी भाषा स्पर्धेमध्ये भिवंडी महानगरपालिकेस राज्यामध्ये ‘तृतीय क्रमांकाचे पारितोषिक’ व रोख १ लाख रुपये रक्कमेचे बक्षीस त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी महानगरपालिकेस मिळवून दिलेले आहे.
झळके हे ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाचे संस्थापक सदस्य,आदिवासी कोळी मल्हार सामाजिक संस्थेचे सदस्य,उपाध्यक्ष, आदिम आधार आदिवासी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, भिवंडी,
राज्य मराठीपत्रकार परिषद, या पत्रकार संघटनेचे ‘ तालुकाध्यक्ष’ आहेत. त्यांनी काही नाटक मालिका व चित्रपटातही भूमिका केलेल्या आहेत.
त्यांना आजपर्यंत ठाणे जिल्हा
वृत्तपत्र लेखक संघाचा पत्रभुषण, श.ना.नवरे यांच्या कथांवर आधारित एकांकिका लेखन स्पर्धेत राज्यस्तरीय
नाट्यदर्पण पुरस्कार,जनजागृती सेवा
समिती महाराष्ट्रच्यावतीने समाजरत्न, मुंबई अचीवर्स एक्सलेंस अवॉर्ड,
स्टार महाराष्ट्र पुरस्कार आदिंनी सन्मानित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे दैनिक सन्मित्रचे संपादक स्व. स.पा.जोशी यांच्या राज्यव्यापी मराठी चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता.तसेच महाराष्ट्र वकील संघटनेचे अध्यक्ष व सर्व सदस्यांसह चळवळीत सहभाग घेऊन कोर्टामध्ये मराठी भाषा वापरात यावी यासाठी ते कार्यरत होते. विविध आदिवासी संघटनांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत असून आदिवासींसाठी काम करीत आहेत. त्यांची “भाग्यलक्ष्मी” ही कादंबरी सध्या प्रकाशनाच्या मार्गावर असून, त्यांच्या अनेक वर्तमानपत्रात बातम्या, लेख. मुलाखती इ. प्रसिद्ध झालेल्या आहेत.त्यांच्या या निवडीने कोकण विभागातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्यावर निवडीबाबत आनंद व्यक्त केला आहे.



















