*
प्रवीण पप्पू शिंदे
शासकीय दाखल्यांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्का पेक्षा अतिरिक्त शुल्क दराची मागणी झाल्यास महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर कारवाई करण्याचे आश्वासन घोडेगाव तालुका आंबेगाव येथील आयुक तहसीलदार सचिन वाघ यांनी दिले आहे, उत्पन्न रहिवासी आणि जात प्रमाणपत्रासाठी शासनाने काही ठराविक तर निश्चित केले आहेत या दरापेक्षा अतिरिक्त पैसे काही केंद्रांवर ग्राहकांकडून घेऊन लूट होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे शाळेच्या निकालाची वाट न पाहता जून महिन्यामध्ये केंद्रावर गर्दी करण्यापेक्षा एप्रिल पासूनच नागरिकांनी आवश्यक ती कागदपत्रे शासनाने ठरवून दिलेल्या महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर जाऊन आवश्यक ती कागदपत्रे व योग्य ते शुल्क देऊन काढून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सचिन वाघ यांनी केले आहे



















