🕯️
प्रवीण पप्पू शिंदे
प्रशासनाच्या
च विलंबामुळे, कागदोपत्री प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे जर एखाद्या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, तर हा केवळ वैयक्तिक नाही तर सामाजिक प्रश्न आहे
ओमकार रामप्रसाद गायकवाड…
एक होतकरू, शांत आणि स्वप्नांनी भरलेला मुलगा…
मागील एक महिन्यापासून त्याचे वडील आणि मी स्वतः ओमकारच्या कुणबी जात प्रमाणपत्रासाठी सातत्याने प्रयत्न करत होतो. संबंधित अधिकाऱ्यांनी “दोन दिवसांत प्रमाणपत्र देतो” असे आश्वासनही दिले होते.
परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते…
त्या आश्वासनाची पूर्तता होण्यापूर्वीच ओमकारने आत्महत्या करून या जगाचा निरोप घेतला.
ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन सुन्न करणारी आहे.
एका तरुणाचे स्वप्न, त्याचे भविष्य आणि एका कुटुंबाचा आधार एका क्षणात हिरावला गेला.
प्रशासनाच्या विलंबामुळे, कागदोपत्री प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे जर एखाद्या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, तर हा केवळ वैयक्तिक नाही तर सामाजिक प्रश्न आहे
ओमकारला भावपूर्ण श्रद्धांजली…
ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
🙏 ओम शांती 🙏
प्रवीण पप्पू शिंदे. अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव
(मराठा सेवक)


















