प्रतिनिधी. प्रवीण पप्पू शिंदे
संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
भिगवणची तहकूब झालेली ग्रामसभा नुकतीच पार पडली यामध्ये ग्रामस्थांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या मुद्द्यावर ग्रा.प.अधिकारी दत्तात्रय परदेशी व सत्ताधारी यांची बोलती बंद झालेली पहावयास मिळाली.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला यामध्ये नागरिकांना सुलभ सेवा देणे,आरोग्य,शिक्षण, उपजीविका, ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रामधून शासनाच्या विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणे,नागरीकांच्या सर्व तक्रारी निकाली काढणे, ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करुन त्यावर सर्व माहिती प्रसिध्द् करणे,गावात सीसीटीव्हीे बसविणे,पात्र लाभार्थ्यांना आयुषमान भारत कार्ड उपलब्धर करुन देणे अशी शेकडो कामे करणे आवश्यक असताना ग्रामसभेत या अभियानाच्या अंमलबजावणी बाबत माहिती विचारली असता ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी व सत्ताधारी निरुत्तर झाले याचा अर्थ या अभियानाला ग्रामपंचायतनेच हरताळ फासल्याचे निदर्शनास येत आहे.यावेळी ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी हे वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नाहीत,कामाचा पाठपुरावा करत नाहीत,फोन उचलत नाहीत, कर्तव्यात कसून करत आहेत,चुकीच्या कामांना पाठीशी घालत असल्याचे आरोप कपिल लांडगे,अजय भिसे,सुरज खटके यांनी केले.यावर परदेशी यांनी सारवासारव करत वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.गावातील भटक्या/ त्रासदायक श्वानांचा अनेकांना त्रास होत असल्याने त्यांना पकडून बंदोबस्त करण्याबाबतची चर्चा मागील ग्रामसभेत होऊनही ग्रामपंचायतने त्यावर ठोस कारवाई न केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.याबाबत ग्रा.प.अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामपंचायतीला सदरचे काम करता येत नसेल तर आम्ही श्वानांचा बंदोबस्त करू असे प्रा.तुषार क्षीरसागर यांनी म्हटले.त्याचबरोबर भिगवण स्टेशन येथे पिण्याच्या पाण्याची जुनी पाईप लाइन टाकली असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.तेथील गटार तुंबल्या आहेत,रस्ते,पाणी, अतिक्रमण थकीत बिले अशा विविध विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली परंतु ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी व सत्ताधारी यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. नंतर सरपंच गुरप्पा पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.



















