संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
शनिवार दिनांक *२७ डिसेंबर २०२५* रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, भिगवन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर डिकसळ ता इंदापूर जिल्हा पुणे येथे मा हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय भिगवन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिर डिकसळ, तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे दि २७/१२/२०२५ ते दि ०२/०१/२०२६ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सुधीर इंगळे, माजी संचालक राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे लाभले होते. डॉ सुधीर इंगळे यांना भारत सरकारने इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या मनोगतामध्ये डॉ सुधीर इंगळे म्हणाले, “राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विशेषता शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभागामध्ये जलक्रांतीची योजना मी प्राधान्याने राबवली. माण- खटाव सारख्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलक्रांती घडून आणली. एन.एस.एस. च्या माध्यमातून स्वयंसेवकाच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच त्या दुष्काळी परिसराचा कायापालट करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यशस्वी झाले.”.याप्रसंगी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ तानाजी रावसाहेब मगर म्हणाले आमच्या महाविद्यालयातील स्वयंसेवक आणि स्वयंशी का यांचं कार्य खूप चांगला आहे आमच्या कार्यामध्ये त्यांचा कार्य चांगला असल्यामुळेच आमच्या युनिटला ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच डॉ. अनिल बनसोडे यांना ‘उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’ पुरस्कार मिळालेला आहे. तसेच, आमच्या स्वयंसेवकांना ‘उत्कृष्ट स्वयंसेवक’ पुरस्कार सावित्रीबाई फुले पुढील विद्यापीठ पुणे यांनी प्रदान केला आहे.” पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक म्हणून आमच्या महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ अनिल बनसोडे यांच्यावर विद्यापीठांनी जबाबदारी दिलेली आहे.”विशेष श्रमसंस्कार शिबिर डिकसळ” या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मा विनोद महांगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक भिगवन पोलीस स्टेशन उपस्थित होते. तसेच, डिकसळ, भिगवन, तक्रारवाडी, पोंधवडी, मदनवाडी या पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्ते राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. तसेच डिकसळ गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रा संदिप साठे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शाम सातार्ले यांनी केले. मौजे डिकसळ गावच्या उपसरपंच श्रीमती ज्ञानेश्वरी कुंभार यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले.



















