संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
राष्ट्रसंत समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची भिगवन येथे परीट समाज संघटनेच्या वतीने व भिगवन ग्रामपंचायत च्या वतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली.राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मारक या ठिकाणी बाबांचे पूजन करण्यात आले तसेच ग्रामपंचायत मध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी भिगवन ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच गुराप्पा पवार, इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य संजय देहाडे, भिगवण ग्रामपंचायत चे मा. सरपंच विद्यमान सदस्य तुषार क्षीरसागर,सदस्य सचिन बोगावत,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते अजिंक्य माडगे, दत्तात्रय पाचांगणे, प्रदीप वाकसे,खानावटे ग्रामपंचायत मा. सरपंच तसेच इंदापूर तालुका पत्रकार संघाचा अध्यक्ष बबन धायतोंडे, पत्रकार संजय शिंदे, पत्रकार अरुण भोई,दत्तात्रय आहेर,शेलार तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थ उपस्थित होते.परीट समाज्याचे जेष्ठ व महाराष्ट्र परीट (धोबी )सेवा मंडळाचे पुणे जिल्हा मा. अध्यक्ष नवनाथ कदम, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष निलेश गायकवाड, इंदापूर तालुका अध्यक्ष गणेश राक्षे,भरत कदम,अरुण नवले,सुदाम गायकवाड, प्रशांत शिंदे, योगेश गायकवाड,अभि शिंदे,आबा थोरात आदिजन उपस्थित होते.



















