जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
रेल्वेमंत्री :-मोदीसाहेब, पुणे -नाशिक रेल्वेचे जनक आढळराव पाटील आंदोलन करण्याची भाषा करत आहेत.म्हणतात आम्ही काय बैलगाडीने प्रवास करायचा का ?
प्रधानमंत्री :- त्यांनी त्यांची सर्व सूत्रे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या हातात दिली आहेत आपण
काय करायचं.?ते आता खासदार नसले तरी काय झालं ते कधी आपल्याला भेटायला आले का तरी ?
ते संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात संगमनेरमधूनच रेल्वे झाली पाहिजे यासाठी तुम्हाला येऊन भेटून गेले का नाही ?
अहो ,आढळराव पुणे -नाशिक रेल्वेसाठी एवढे तडफडले त्यापेक्षा ते डिंभा-घोडेगाव-गिरवली-महाळुंगे -कळंब-मंचर-राजगुरूनगर-चाकण-पुणे अशी रेल्वे करा म्हणून मला किंवा तुम्हाला भेटले असते तर आपण नक्कीच हिंदूचे श्रद्धास्थान असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी भिमाशंकर ज्योतिर्लिंगासाठी पुणे -डिंभा रेल्वे चालू केली असती.रेल्वे सुरू करण्यासाठी खूप मोठी स्वप्ने बघायची आवश्यकता नसते.
रेल्वेमंत्री:- ते कसं काय मोदी साहेब ?
पंतप्रधान मोदी :-त्याच असं आहे बघा .बारामती -मनमाड रेल्वे काही अशीच सुरू झाली नाही तर दौंड मनमाड रेल्वे आधी झाली आणि मग पवार साहेबांनी फक्त बारामती -दौंड रेल्वेचा पाठपुरावा केला आणि बारामती -मनमाड रेल्वे झाली.
अगदी तसंच आहे बघा शिर्डी रेल्वेचं.दौंड -मनमाड रेल्वे झाली आणि विखे पाटलांनी फक्त पुणतांबा-शिर्डी रेल्वेसाठी पाठपुरावा केला आणि शिर्डीला रेल्वे आली.
अगदी अगदी तसंच आढळराव पाटलांनी फक्त पुणे -भिमाशंकर रेल्वे करा असं जरी सांगितलं असतं तर आढळरावांची रेल्वे कधीच झाली असती आणि आपलं सरकार केंद्रात असल्याने आढळरावांचं त्यांच्या मतदारसंघात वजन वाढलं असतं आणि आपल्या सरकारला भारतातील हिंदूंनी भिमाशंकर ज्योतिर्लिंग रेल्वेने जोडल्याने आपलं केंद्रातील वजन अजून वाढले असते.छोटे छोटे रेल्वेमार्ग मंजूर करत करतच मोठे रेल्वेमार्ग तयार होतात पण आढळराव मोठा खर्चिक पुणे -नाशिक रेल्वे प्रकल्प घेऊन आले आणि तिथेच मार बसला.
रेल्वेमंत्री:-मग मोदींजी आता पुणे -नाशिक रेल्वेचे वातावरण खूप तापत चालले आहे तर काय करायला पाहिजे ?
पंतप्रधान मोदी :-आता जे कोणी तुम्हाला भेटायला येतील त्यांची निवेदने स्विकार करून रेल्वेचे अधिकारी,आमदार खासदार, मंत्री यांची बैठक लाऊन यावर मध्यवर्ती तोडगा काढण्यासाठी वेळ मागून घेऊन ही पंचवार्षिक कशी तरी ढकलत पुढे पुढे नेऊ आणि आपल्या विचाराचा ,आपल्या पक्षाचा खासदार निवडून कसा आणता येईल यावरती भर देऊ.



















