जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
यावेळी मस्साजोग, जि. बीड येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी ठाम मागणी केली.
तसेच बीड जिल्ह्यातील स्व. महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणी तपासात होत असलेल्या दिरंगाईकडे लक्ष वेधून, मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी, अशी भूमिका मांडली.
फलटण येथे झालेल्या स्व. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यासोबतच महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या विदारक परिस्थितीची माहिती देऊन, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून राज्याला भरीव मदत मिळावी, अशी मागणी केली.
तसेच नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान झालेला हिंसाचार व मोठ्या प्रमाणावर आढळलेल्या रोख रकमा हे लोकशाहीसाठी चिंताजनक असून, याबाबत योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी भूमिका स्पष्टपणे मांडली.



















