*
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रवीण पप्पू शिंदे
कष्टकरी, श्रमिक, मजूर, हमाल आणि वंचितांच्या चळवळीतील निर्भय आणि संवेदनशील आवाज काळाच्या पडद्याआड.
*🌹भावपूर्ण श्रद्धांजली!🙏*
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा “जातीच्या निर्मूलनाचा लढा” कृतिशील करण्यासाठी महाराष्ट्रात “एक गाव एक पाणवठा”ही चळवळ सत्यशोधक बाबा आढाव यांनी यशस्वीपणे राबवली. असंघटित , वंचित ,माथाडी कामगार चळवळीचे झुंजार नेते व त्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढे डॉ .बाबा आढाव यांनी लढले आहेत. लातूरातील पन्नास वर्षांपूर्वी आडत बाजार या ठिकाणी असलेली सामाजिक विषमता व अमानुष असलेली वेठबिगारी व्यवस्था मोडीत काढण्याचे काम बाबांनी केले. २७ नोव्हेंबर १९७१ मध्ये त्यांनी महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना करून २८ नोव्हेंबर १९७१पासून एक गाव एक पाणवठा ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवली.
महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाची विचारधारा महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी त्यांनी महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले त्यातील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे सत्यशोधक साहित्याची पुस्तके निर्माण करणे त्यातूनच “दिनकरराव जवळकर समग्र वाड्.मय, केशवराव जेधे समग्र वाड्.मय, कृष्णराव भालेकर समग्र वाड्.मय ,आम्ही पाहिलेले महात्मा फुले, तृतीय रत्न नाटक, जागृतीकार भगवंतराव पाळेकर समग्र वाड्.मय इत्यादी अनेक महत्त्वाची ग्रंथसंपदा डॉ. बाबा आढाव यांनी निर्माण केली. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी ” पुरोगामी सत्यशोधक ” हे नियतकालिक चालवले. या नियतकालिकातून अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन करून महाराष्ट्रातील प्रागतिक विचारविश्व अत्यंत सशक्त केले.
फुले आंबेडकर शाहू ही विचारधारा महाराष्ट्रात सशक्त करणारे कृतिशील विचारवंत म्हणून डॉ.बाबा आढाव यांचे योगदान अत्यंत मोठे आहे आदरणीय डॉ.बाबा आढाव
“एक गाव एक पाणवठा”आंदोलनाचे प्रणेते,ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव



















