प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटेकर
अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणा मधून प्रवीण पप्पू शिंदे निवडणूक लढवत असून त्यांना दिवसेंदिवस जनतेचा चांगला पाठिंबा लाभत आहे, आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांना अनेक सामाजिक संघटना पाठिंबा जाहीर केला असून नेता नव्हे तर कार्यकर्ता प्रवीण पप्पू शिंदे सर्वांकरता अशी त्यांची जनसामान्यांमध्ये ओळख आहे, तरुणांना रोजगार मिळण्यासाठी सातत्याने त्यांनी आतापर्यंत वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. आंबेगाव तालुक्यामधील कोणतीही निवडणूक असो जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा विधानसभा लोकसभा दोनच प्रश्नावर निवडणुका लढविल्या जातात त्या म्हणजे कलमोडीचं पाणी व माळसाकांत योजना, रिकाम्या हाताला काम देण्याचा निर्धार करून शिंदे हे यंदाची पंचायत समिती निवडणूक अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणातून लढण्यासाठी तत्परतेने हजर आहेत.
*कोट*
*नेता दिलदार है लेकिन चमचोसे से परेशान है.. माझी लढाई सर्वसामान्य शेतकरी कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आहे रोजगाराच्या हमी, ज्येष्ठांसाठी विविध योजना राबविणार असून आंबेगाव पंचायत समिती गणामध्ये निश्चित परिवर्तन घडणार असून माझा एकच ध्यास तो म्हणजे सर्वसामान्यांचा विकास करणे असून जनतेने मला एकदा संधी द्यावी… प्रवीण ( पप्पू) शिंदे*


















