जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
*मंचर येथील ऊस उत्पादक शेतकरी श्री नंदू बाळासाहेब घिसे यांनी ऊस लागवड पूर्वी बेसल डोस,नत्र खताची पहिली मात्रा दिल्या त्यानंतर प्लॉट व्हिजिट दरम्यान 15:15:15 + युरिया एकत्रित टाकून बाळभरणी करावी त्यानंतर दुसऱ्या पाण्याला कारखाना उत्पादितॲझो – फॉस्पो द्रवरूप जिवाणू खताची अळवणी व ॲसिटो बॅक्टर + वसंत ऊर्जा संजीवकाची एकत्रित फवारणी करावी त्यानुसार त्यांनी नियोजन केले व त्यांना अतिशय चांगला रिझल्ट आला त्यानंतर पंधरा दिवसांनी Vsi सूक्ष्म अन्नद्रव्य व द्रवरूप खताची एकत्रित फवारणी घेतली त्यामध्ये पानांची रुंदी उसाची जोमदार वाढ हा फरक प्रामुख्याने जाणवला आहे आज दुसरी फवारणी करते वेळेस व्हिजिट केली शेतकऱ्यास विचारले असता त्यांनी खूप चांगला रिझल्ट आल्याचे म्हटले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी कारखाना उत्पादीत जिवाणू खतांचा व VSI संजीवके,सूक्ष्म अन्नद्रव्य,द्रवरूप खतांचा वापर केला पाहिजे त्यामुळे एकरी ऊस उत्पादनात निश्चित वाढ होणार आहे शेतकरी बांधवांनी त्यासाठी कारखाना मार्गदर्शनाने व्यवस्थापन केले पाहिजे.*




















