₹
– भोर नगरपरीषद निवडणुकीसाठी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी निरीक्षक म्हणून टाकली जबाबदारी. –
जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत पक्ष संघटनेला माझ्याकडून सातत्याने प्राधान्य देण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाची मासिक सभा सहसा मी चुकवत नाही. पक्षाचे काम पहिल्यापासून करीत आल्याने माझ्या ते अंगवळणी पडले आहे. गेले चार दिवस भोर शहरात जाऊन बैठका घेतल्या . उमेदवार निवडण्यापासुन ते प्रचाराची यंत्रणा राबवण्यासंदर्भात सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली. याकामी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी उपसभापती विक्रम खुटवड, माजी जिल्हा परीषद सदस्य चंद्रकांत बाठे , यशवंतमामा डाळ , शहर अध्यक्ष संदीप शेटे इत्यादींनी विषेश पुढाकार घेतला आहे. माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे यांच्या पक्षप्रवेशाने निवडणूकीचे वातावरण पक्षाच्या बाजुने झुकले आहे. उद्या सोमवार दिनांक-१७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता पदयात्रा काढुन सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचे नेतृत्वाखाली सर्व जागा जिंकण्याचा आम्ही संकल्प सोडला आहे.
श्री सुनील चांदेरे ,
उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. पुणे.

















