*
Pune.
अखिल भारतीय मराठा महासंघ सदस्य ते महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन महाराष्ट्र
प्रदेशचे धडाडीचे कार्यकर्ते कै. शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार तसेच सध्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष व व भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांच्या सहवासात व चळवळी तयार झालेला कार्यकर्ता म्हणून प्रामुख्याने ओळख असलेले कमी वयात कामगार क्षेत्रात मोठ्या पदावर काम करण्याची संधी लाभलेले कार्यकर्ते व कामगारांचे प्रश्न माथाडी कामगार असो किंवा जनरल युनियनचे कामगार असो सातत्याने प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करीत असलेले कामगार चळवळीतील नेते म्हणून कामगारांमध्ये प्रामुख्याने प्रवीण उर्फ पप्पू शिंदे यांची ओळख असून सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असून यामध्ये अवसरी बुद्रुक गणामधून प्रवीण (पप्पू) शिंदे यांनी जनसामान्यांच्या जीवावर उडी घेतली आहे, अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन महाराष्ट्र प्रदेश प्रवास असा शून्यातून केलेला प्रवास तसेच गणामध्ये नातेगोते सोयरे असल्यामुळे व कै. दगडूनाना मारुती शिंदे संचालक. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना त्यांच्याकडून तालुक्यातील राजकारणाचे बाळकडू घेऊन येणाऱ्या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत, अवसरी बुद्रुक गणामध्ये शिंदे यांचे असंख्य सगळे सोयरे मित्रपरिवार असल्यामुळे आणि आतापर्यंतचा अवसरी बुद्रुक गणाचा इतिहास पाहता निवडून येणारा उमेदवार हा निसटत्या विजयाने निवडून येत असल्यामुळे या घरांमध्ये एका मताला ही खूप किंमत आहे अशा परिस्थितीमध्ये प्रवीण शिंदे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केल्यामुळे त्यांना राज्य मराठी पत्रकार परिषद राज्यातील माथाडी कामगार संघाने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.

















