“आई
जिल्हा प्रतिनिधी. प्रवीण पप्पू शिंदे
पिंपरी चिंचवड. दत्ता मोकाशी सर
३५ वर्षांचा अविवाहित इंजिनिअर नीरज रात्री उशिरा घरी येत म्हणाला.
गीताबाई (त्याची आई) घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या,
“बाळा, विदेश जाणं खूप गरजेचं आहे का? इथं काही दुसरा मार्ग नाही का?”
“आई, मला एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करायचं आहे. फक्त काही महिन्यांचीच तर गोष्ट आहे,” नीरज म्हणाला.
गीताबाई शांतपणे म्हणाल्या, “जसं तुला योग्य वाटेल तसं कर बाळा.”
दुसऱ्याच दिवशी नीरजने आईला जवळच्या शहरातील एका वृद्धाश्रमात सोडून दिलं.
पहिले काही दिवस गीता देवी शांत होत्या, पण बाकीच्यांच्या चेहऱ्यावर निराशा आणि एकटेपण स्पष्ट दिसत होतं.
एके दिवशी काही वृद्ध महिला एकमेकींशी बोलत होत्या. त्यापैकी एक म्हणाली,
“इंजिनिअर साहेबांना दुसरं कुणी नातलग नाही का, की स्वतःच्या आईला इथे सोडून गेले?”
दुसरी बाई म्हणाली,
“तुम्हाला माहिती नाही का? गीताबाईंचा नवरा खूप आधी गेला. तेव्हा नीरज फक्त पाच वर्षांचा होता.
पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी शिवणकाम करून मुलाला शिकवलं, वाढवलं आणि आज तो मोठा इंजिनिअर झाला.”
काळ पुढे सरकत गेला. दोन वर्षं उलटली.
गीता देवी वारंवार नीरजला फोन करत असत, पण प्रत्येक वेळी त्याचं उत्तर तेच —
“आई, मी अजून अमेरिकेतच आहे. परत आल्यावर घेऊन जाईन तुला.”
हळूहळू आश्रमातले सगळेजण म्हणू लागले,
“इंजिनिअर साहेब परदेशात गेलेच नसतील, फक्त आईला टाकण्यासाठी बहाणा केला असेल.”
कुणीतरी म्हणालं,
“कदाचित त्याचं कोणाशी लग्न ठरलं असेल, आणि समोरच्या लोकांनी अट ठेवली असेल की आईला वेगळी ठेव.”
गीता देवी आतून तुटत चालल्या होत्या.
आता त्यांना मुलगा पुन्हा दिसेल, ही आशाच राहिली नव्हती.
आणखी दोन वर्षांनंतर, एक दिवस वृद्धाश्रमातच त्यांचं निधन झालं.
संचालक जाधवांना कुणीतरी म्हणालं,
“नीरजला बातमी कळवा, कदाचित तो अजून परदेशात असेल.”
जाधवांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले,
“नीरजला जाऊन तीन वर्षं झालीत.”
सगळे थक्क झाले.
कोणीतरी विचारलं,
“पण मग गीताबाई फोनवर कोणाशी बोलायच्या?”
जाधवसाहेब म्हणाले,
“तो फोन माझ्याकडे होता, ज्यात नीरजचा आवाज रेकॉर्ड केलेला होता.”
“पण असं का?”
जाधव म्हणाले,
“नीरज जेव्हा आईला इथे ठेवून गेला तेव्हा म्हणाला होता,
‘जाधव साहेब, मला ल्युकेमिया (ब्लड कॅन्सर) आहे.
माझ्या शेवटच्या अवस्थेत आई माझं दु:ख पाहू शकणार नाही.
ती तुटून जाईल.
म्हणून मला तिला या वेदनेपासून वाचवाचय.
माझ्या मृत्यूनंतर माझी सगळी मालमत्ता आश्रमाला दान करा.’”
हे ऐकून तिथल्या सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.
गीताबाईंचे अंतिम संस्कार आश्रमातच करण्यात आले,
आणि त्या वेळी अनेक जणांनी स्वतःच्या आई-वडिलांना पुन्हा घरी नेण्याचा निर्णय घेतला.
✨ शिकवण:
ही गोष्ट आई-मुलाच्या नात्यातील त्या नि:स्वार्थ प्रेमाची आहे,
ज्यात शब्दांपेक्षा भावना अधिक बोलतात.
आई-वडिलांना प्रेमाने आणि सन्मानाने आपल्या सोबत ठेवणं हीच खरी कर्तव्यपूर्ती आहे. ❤️
जय जय राम कृष्ण हरि माऊल

















