*
आंबेगाव.
अखिल भारतीय मराठा महासंघ सदस्य ते महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन महाराष्ट्र
प्रदेशचे धडाडीचे कार्यकर्ते कै. शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार तसेच सध्याची अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष व व भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री दिलीप दादा जगताप यांच्या सहवासात व चळवळी तयार झालेला कार्यकर्ता म्हणून प्रामुख्याने ओळख आहे. कमी वयात कामगार क्षेत्रात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मा.दिलीप दादा जगताप यांच्या आशीर्वादाने मिळाली कामगारांचे प्रश्न माथाडी कामगार असो किंवा जनरल युनियनचे कामगार असो सातत्याने प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करीत राहत होतो कामगार चळवळीतील नेते कामगारांमध्ये प्रामुख्याने ओळख आहे कामगाराच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहत असून नेहमीच कामगाराच्या हितासाठी निर्णय घेत,साधी राणीमान उच्च विचार जोपासत आहे,
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असून यामध्ये अवसरी बुद्रुक गणामधून प्रवीण (पप्पू) शिंदे यांनी जनसामान्यांच्या जीवावर उडी घेतली असून येत्या निवडणुकीमध्ये जनसामान्यांना न्याय देण्यासाठी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे,भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा कर्मचारी ते महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव, अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन महाराष्ट्र प्रदेश प्रवास असा शून्यातून केलेला प्रवास तसेच गणामध्ये नातेगोते सोयरे असल्यामुळे व कै दगडू नाना मारुती शिंदे संचालक. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना त्यांच्याकडून तालुक्यातील राजकारणाचे बाळकडू घेऊन एकेकाळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा कर्मचारी ते माथाडी व जनरल युनियन कामगार पदाधिकारी पर्यंत प्रवास करून सामाजिक व कामगार संबंधी प्रश्नाची उत्तम जाण असल्यामुळे शिंदे कार्ड यशस्वी झाल्यास प्रवीण (पप्पू) शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
















