“
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
पारगाव (चिचगाई) येथील भगिनी अश्विनी शिवाजी ढोबळे यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना अत्यंत दुःखद आहे.दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही,हे सर्वांसाठी दिलासादायक आहे.
या भागात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पाश्वभूमीवर मा.गृहमंत्री मा.दिलीपराव वळसे पाटील आणि मा.खासदार,अध्यक्ष,म्हाडा पुणे मा.शिवाजीराव आढळराव पाटील
यांनी दोन-तीन दिवसांपूर्वीच वनमंत्री,महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन वनविभागाला तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
आज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शरद बँकेचे उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील त्यांनी अश्विनीताई व त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला व परिस्थितीची पाहणी केली.
या वेळी मंचर वनपरीक्षेत्र अधिकारी विकास भोसले, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव ढोबळे,तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष रविंद्र करंजखेले, आंबेगाव तालुका खरेदी-विक्री मा.अध्यक्ष अनिल वाळुंज,भीमाशंकर कारखाना संचालक माऊली आस्वारे,विठ्ठल टिंगरे,निवृत्ती ढोबळे,शुभम चांगण,सचिन ढोबळे,विशाल ढोबळे तसेच चिचगाईवस्ती-पारगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व नागरिकांनी व पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी, ही नम्र विनंती.


















